Raj Thackeray : अर्बन नक्षलवाद ते गुजराती संमेलन… राज ठाकरे शेकापच्या मेळाव्यातून कडाडले; पाहा A टू Z भाषण
'सर्व पक्षांनी नवीन विमानतळावर सर्वाधिक १०० टक्के मराठी मुलं आणि मुली कामाला लागले पाहिजे. बाहेरून कोणी तरी उद्योगपती येणार, जमिनी घेणार, धंदे घेणार आणि वाट्टेल ते थैमान घालणार. जमिनी आणि सर्व गोष्टीवर राज्य सरकारने कायदा आणला. तुम्ही कोण तर अर्बन नक्षल. शहरात राहणारे नक्षल. तुम्ही कोणत्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं. एकदा करूच देत.'
पनवेल येथे आज शेतकरी कामगार पक्ष अर्थात शेकापचा 78 वा वर्धापन दिनानिमित्त शेकापचा वर्धापन दिन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामेळाव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. या शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यातून राज ठाकरेंनी अर्बन नक्षलवादापासून ते गुजराती संमेलनापर्यंत सर्वच विषयावर भाष्य केलं. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा देखील राज ठाकरेंनी साधला.
गुजराती साहित्य संमेलनावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र राज्य स्वतः गुजराती साहित्य संमेलन भरवत आहेत. व्यापाऱ्यांच्या चोपड्यांमधून पुस्तकांच्या चोपड्यात लक्ष गेलं तर जास्त बरं. पण हे काय चालू आहे. केवळ गुजराती माणसाबद्दलचं प्रेम नाही. मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची लागावी. त्यांची भांडणं व्हावी. त्यातून मतं कशी काढू शकतो, त्यासाठी काय काय करता येईल, यासाठीचे उद्योग आहेत. त्यांना वाटलं राज ठाकरे, संजय राऊत आम्ही त्यावर लगेच रिअॅक्ट होऊ. होणार नाही. आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू. तुम्हाला जे पाहिजे ते करणार नाही. बिलकूल करणार नाही. जेव्हा समजेल तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागतंय तेव्हा अंगावरच येऊ, असा इशारा त्यांनी दिला. यासह अर्बन नक्षलवादावर भाष्य करताना राज ठाकरे चांगलेच कडाडल्याचे पाहायला मिळाले.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

