Thackeray Brothers : राज ठाकरे 6 वर्षांनी ‘मातोश्री’वर, 22 दिवसात दुसरी भेट अन् पुन्हा युतीच्या चर्चांचा समेट? निमित्त उद्धव ठाकरेंचा वाढदिवस
तब्बल सहा वर्षानंतर मातोश्रीवर जात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भेटीनंतर माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख असाही उल्लेख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचा केलाय. 22 दिवसात दोन्ही बंधूंच्या या दुसर्या भेटीन युतीच्या चर्चाना बळ मिळतंय.
जवळपास सहा वर्षानंतर मातोश्रीवर येत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. काल दुपारी १२. १० च्या दरम्यान, राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले. मंचावर येऊन राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि पुष्पगुच्छ दिलं. या भेटीमुळे पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांना बळ मिळाले. या भेटीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे शुभेच्छा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी ट्विटर केलेली एक पोस्ट… ज्यात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख म्हणून केलाय. माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानावर जाऊन शुभेच्छा दिल्या, असं म्हटलंय.
दरम्यान शुभेच्छांच्या औपचारिक कार्यक्रमानंतर दोन्ही भावांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली. शुभेच्छा देताना राज ठाकरे सोबत बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई तर उद्धव ठाकरे सोबत संजय राऊत, अंबादास दानवे, भास्कर जाधव आणि अरविंद सावंतही उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर उभे राहत दोघांनीही फोटोपोझही दिल्या. या भेटीनंतर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘घरी येऊन त्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याच्यामुळे साहजिकच आहे मी परत सांगतो की आपल्या एक भाषेमध्ये शब्दप्रयोग द्विगुणित तर त्याच्याही पेक्षा कित्येक पटीने आजचा आनंद हा माझा कित्येक पटीने जास्त आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

