Raj Thackeray : महाराष्ट्राला फक्त हात घालून दाखवा, आम्ही गांxxxx राज ठाकरेंचा थेट इशारा
'हिंदी भाषिक राज्य आर्थिक दृष्ट्या मागास. हिंदी न बोलणारी राज्य आऱ्थिक दृष्ट्या प्रगत. आणि वर हिंदी शिकायची आम्ही. हिंदी बोलणाऱ्यांना राज्य सांभाळता आलं नाही. रोजगाराला इकडे येतात. आम्ही आम्ही हिंदी शिकायचं. ', राज ठाकरे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून आक्रमक
हिंदीची सक्तीकरून पाचवी नंतर मुलं काय हिंदी चित्रपट सृष्टीत जाणार का? असा सवाल करत राज ठाकरे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून पुन्हा आक्रमक झाले. आमचा भाषेला विरोध नाही. एक भाषा, एक लिपी उभी करायला वर्ष लागेल. अमित शाह म्हणाले इंग्रजी येतं त्यांना इंग्रजी येत असल्याची लाज वाटेल. तुम्हाला नाही येत.. असं म्हणत अमित शाहांनाच खोचक टोला लगावला.
पुढे राज ठाकरे असंही म्हणाले, की, या हिंद प्रांतात सव्वाशे वर्ष आम्ही राज्य केलं. आम्ही मराठी लादली. गुजरात, पंजाब, मध्यप्रदेश अटोकपर्यंत आम्ही पोहोचलो. आम्ही लादली? हिंदी भाषा २०० वर्षापूर्वीची भाषा आहे. महाराजांच्या काळातही नव्हती. कशासाठी आणि कोणासाठी? यांनी फक्त चाचपडून पाहिलं. मुंबई स्वतंत्र करता येते का यासाठी भाषेला डिवचून बघू. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. कुणाची माय व्यालीय त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवा. मुंबईला हात घालून दाखवा. मजाक वाटला का. आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत.

कोकाटे खरंच रमी खेळत होते? बघा खरं काय? कोकाटेंनी सगळंच सांगितलं अन्..

200 दिवस न बोलता काढले पण... मुंडेंनी विरोधकांना चांगलंच फटकारलं

देवेंद्र दरबारी, मंत्री रमी खेळती भारी..कोल्हेंची कृषीमंत्र्यांवर टीका

फडणवीस अन् आदित्य ठाकरेंची सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट? नेमकं घडतंय काय?
