नवीन शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेसच्या मांडीवर बसली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर आणि उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी हिंदुहृदयसम्राटांचं भाषण म्हणजे असायची पर्वणी आता मात्र सगळंच अळणी, गरम पाण्याच्या नावाखाली नुसतंच कोमट पाणी, नवीन शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेसच्या मांडीवर बसली आहे. अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस संदीप देशापांडे यांनी टीका केलीय.

मुंबई: शिवसेनेचा दसरा मेळावा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या मेळाव्या उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार तोफ डागत सेनेच्या आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट केली. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर आणि उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी हिंदुहृदयसम्राटांचं भाषण म्हणजे असायची पर्वणी आता मात्र सगळंच अळणी, गरम पाण्याच्या नावाखाली नुसतंच कोमट पाणी, नवीन शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेसच्या मांडीवर बसली आहे. अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस संदीप देशापांडे यांनी टीका केलीय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI