Kalyan Rada : कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला बेदम मारहाण, मनसे दिला इशारा; ‘येत्या २४ तासात जर पोलिसांनी…’
कल्याण पश्चिम येथे अमराठी लोकांकडून भाषिक शेरेबाजीनंतर मराठी कुटुंबाला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेनंतर मराठी माणसाच्या पाठी ताकदीने उभं राहणार, अशी मनसेकडून भूमिका घेण्यात आली आहे.
कल्याण पश्चिम येथे अमराठी लोकांकडून भाषिक शेरेबाजीनंतर मराठी कुटुंबाला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा मराठी भाषा हा मुद्दा चर्चेत आला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष असताना मराठी माणसाच्या पाठी ताकदीने उभं राहणार, अशी मनसेकडून भूमिका घेण्यात आली आहे. जर २४ तासात पोलिसांनी मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या शुक्ला नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं नाही तर मनसे आपल्या स्टाईलने जिथे असेल तिथून त्या व्यक्तीला उचलून पोलिसांच्या हावाले करणार असा इशारच कल्याण येथील मनसेकडून देण्यात आला आहे. कल्याण पश्चिमेतील हायप्रोफाईल सोसायटीत दोन अमराठी कुटुंबियांमध्ये भांडण सुरु होतं. तो वाद मिटवण्यासाठी शेजारे राहणारे मराठी कुटुंबातील व्यक्ती धीरज देशमुख यांनी हस्तक्षेप केला. यावेळी धीरज देशमुख यांनी दोन्ही कुटुंबांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी एका अमराठी महिलेने तुम्ही मराठी लोक भिकारडे आहात. चिकन मटन खावून घाण करणारे आहात, अशी शेरेबाजी केल्याने हा वाद वेगळ्या मार्गाला लागला. यानंतर अमराठी कुटुंबाने बाहेरुन माणसं मागवून मराठी कुटुंबियांच्या घरात घुसून लोखंडी रॉडने मारहाण केली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

