Monsoon BIG Breaking : आला रे…आनंदाची बातमी, हवामान खात्याकडून ‘ही’ अधिकृत घोषणा, महाराष्ट्रात मान्सूनची एन्ट्री कधी?
मान्सूनची वाट पाहणाऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. आता महाराष्ट्रात कधी होणार दाखल?
मान्सून संदर्भात एक आनंदाची बातमी आहे. केरळमध्ये मान्सू दाखल झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे. भारतीय हवामान विभागाकडून यासंदर्भात अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे. याआधी 2009 मध्ये मान्सून केरळात 23 मे रोजीच दाखल झाला होता. त्यानंतर तब्बल 15 वर्षांनी मान्सून इतक्या लवकर केरळात दाखल झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, कोकणात पुढीच चार ते पाच दिवसांत मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज असून सध्या मान्सून पूर्व पावसाने चांगलीच दाणादाण उडवून दिली आहे. मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. तर एक आठवड्यापूर्वीच मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तविली जात आहे.
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या आधीच्या अंदाजानुसार 27 मे रोजी मान्सून केरळमध्ये येणार होता. म्हणजेच चार दिवस आधी मान्सून दाखल होणार होता. मागील वर्षी केरळमध्ये 30 मे रोजी मान्सून आला होता. मात्र IMD ने वर्तविलेल्या अंदाजाच्या आधीच मान्सूनची सरप्राईज एन्ट्री पाहायला मिळत आहे.