AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deepak Kesarkar | 'भाजपच्या ताब्यात महापालिका गेली असती पण फडणवीसांनी मोठं मन दाखवलं'-tv9

Deepak Kesarkar | ‘भाजपच्या ताब्यात महापालिका गेली असती पण फडणवीसांनी मोठं मन दाखवलं’-tv9

| Updated on: Aug 20, 2022 | 2:04 PM
Share

तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर मोठं मन दाखवलं नसतं तर त्याचवेळी मुंबई महापालिका ही भाजपच्या ताब्यात गेली असती, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर पहिल्यांदाच पावसाळी अधिवेश सुरू झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारचं हे पहिलंच अधिवेशन असून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातच पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी अनेक घोषणा विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात पायऱ्यांवर दिल्या. त्यावरून तसेच राज्याच्या जनतेचा कोणी विश्वासघात केला. तर तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर मोठं मन दाखवलं नसतं तर त्याचवेळी मुंबई महापालिका ही भाजपच्या ताब्यात गेली असती, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे. तसेच केसरकर यांनी बीजेपीचं पूर्ण बहुमत महापालिकेमध्ये येण्याची शक्यता होती. तसे त्यावेळी घडलं सुद्धा असतं मात्र देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव साहेबांचा मान राखला. त्यांनी उद्धव ठाकरे यांना एक मुखी पाठिंबा दिला. मराठी माणसाचा स्वाभिमान त्या ठिकाणी कसा राखला जाईल हे फडणवीस यांनी बघितलं. मात्र उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांबरोबर कायं? याला काय म्हणायचं असा सवाल उपस्थित केला. तसेच तुमच्याबद्दल अपशब्द उपचारायचा नाही हे मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे.