Pawan Khera : मोरारजी देसाईंनी रॉ एजेंट्सची माहिती पाकिस्तानला दिली? कॉंग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा
Morarji Desai leaked RAW information : कॉंग्रेस नेत्याकडून मोरारजी देसाई यांच्याविषयी खळबळजनक दावे करण्यात आलेले आहेत. त्यामुळे चर्चा सुरू झाल्या आहेत.
मोरारजी देसाई यांनी पाकिस्तानला रॉ एजेंट्सची माहिती दिली, असा मोठा दावा कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी केला आहे. रॉ एजेंट्सची सर्व तयारी मोरारजी देसाई यांनी पाकिस्तानला सांगितली असंही पवन खेडा यांनी म्हंटलेलं आहे.
यावेळी बोलताना पवन खेडा म्हणाले की, ‘मी इतिहासात जाणार आहे, हा एक अतिशय महत्त्वाचा अध्याय आहे, मोरारजी देसाई यांना जनसंघ आणि जनता पक्षाने मिळून पंतप्रधान बनवले होते, हे इतिहासात नोंदवले गेले आहे, ही काही बढाई मारण्याची किंवा व्हॉट्सअॅपची चर्चा नाही. जेव्हा मोरारजी देसाई देशाचे पंतप्रधान होते, तेव्हा त्यांनी जनरल झिया-उल-हकला फोन केला आणि सांगितले की कहूता येथील अणुप्रकल्पासाठी पाकिस्तानमध्ये काय तयारी सुरू आहे हे रॉच्या लोकांनी आम्हाला सांगितले आहे. त्यांनी रॉची सर्व माहिती आणि संपूर्ण पायाभूत सुविधा पाकिस्तानला सांगितली. त्यानंतर काही दिवसांनी, आपण रॉचे अनेक लोक गमावले. पाकिस्तानने त्यांना गायब केलं, मारलं की अजून काही केलं हे अद्यापही आपल्याला माहित नाही, असा मोठा खळबळजनक दावा खेडा यांनी केला आहे.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

