मोशी इमारत दुर्घटनेत मोठी अपडेट; 9 जणांची सुटका; ढिगाऱ्याखाली अजूनही 8 जण अडकल्याची भीती
पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर बचावकार्य दुसऱ्या दिवशीही युद्धपातळीवर सुरू आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत ९ जणांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळवले असून, ढिगाऱ्याखाली आणखी ८ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ही दुर्घटना काल घडली असून, त्यानंतर तातडीने बचाव आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), अग्निशमन दल, लष्कराचे जवान, पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय पथके सातत्याने कार्यरत असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली असून, आपल्या प्रियजनांची सुखरूप सुटका व्हावी या आशेने ते घटनास्थळीच थांबले आहेत. परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून बचावकार्य अधिक वेगाने सुरू ठेवण्यात आले आहे.
अद्याप ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू असून, बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच दुर्घटनेचे नेमके कारण आणि अंतिम माहिती स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
Published on: Jul 09, 2026 10:55 AM
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला