AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्ता स्थापनेसाठी दिल्लीत हालचाली; एकनाथ शिंदे होणार आज दिल्लीत दाखल?

Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 28, 2022 | 2:24 PM
Share

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसकर यांनी  TV9 मराठी सोबत विशेष बातचीत केली. यामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असलेली युती तोडावी आम्ही वापस यायला तयार आहोत अशी भूमिका स्पस्ट केली. यासाठीचा आजचा शेवटचा दिवस असल्याचे सूचक वक्तव्य देखील त्यांनी केले आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस […]

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसकर यांनी  TV9 मराठी सोबत विशेष बातचीत केली. यामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असलेली युती तोडावी आम्ही वापस यायला तयार आहोत अशी भूमिका स्पस्ट केली. यासाठीचा आजचा शेवटचा दिवस असल्याचे सूचक वक्तव्य देखील त्यांनी केले आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या दिशेने रवाना झालेले आहेत. दिल्लीत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. शिंदे गटातला एकही आमदार उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांच्या संपर्कात नसल्याचे आमदार केसकर यांनी सांगितले. जर कोणी संपर्कात असेल तर त्यांनी ते स्पष्ट करावं आम्ही स्वतःहून त्यांना आणून सोडू असेही ते म्हणाले.

Published on: Jun 28, 2022 02:24 PM

Follow Us