संजय राऊत यांना मिळालेल्या धमकीबाबत अरविंद सावंत म्हणतात…
VIDEO | संजय राऊत यांना मिळालेल्या धमकीबाबत खासदार अरविंद सावंत यांनी दिली प्रतिक्रिया, बघा काय म्हणताय?
मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्वतःवर हल्ला होईल, अशी भीती व्यक्त करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ल्याचा कट आखल्याचा संजय राऊत यांनी पत्रात दावा केला आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या व्यक्तीच्या जिवीताला धोका आहे, जे खासदार, नेते, संपादक आणि पत्रकार आहेत, त्यांच्या जिवाला धोका असल्याने त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं, तसाच प्रकार माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना देखील असं होत आहे, हे किती गंभीर आहे, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे. बघा आणखी काय म्हणाले अरविंद सावंत…
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट

