रवी राणांचं भाषण ऐकून सभेच्या मंचावर नवनीत राणांना अश्रू अनावर, बघा व्हिडीओ
राणांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते. नवनीत राणांच्या नामांकन रॅलीच्या आधी दसरा मैदानात महायुतीची जाहीर सभा पार पडली. यावेळी आमदार रवी राणा यांनी भाषणात आमदार बच्चू कडू यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राणांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते. नवनीत राणांच्या नामांकन रॅलीच्या आधी दसरा मैदानात महायुतीची जाहीर सभा पार पडली. यावेळी आमदार रवी राणा यांनी भाषणात आमदार बच्चू कडू यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय आहे. आमचा एक मित्र देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उपयोग करून घेतात, असे रवी राणा म्हटले. तर रवी राणांचं भाषण सुरू असताना भाषण ऐकूण नवनीत राणा यांना अश्रू अनावर झालेत. रवी राणांनी यावेळी बच्चू कडूंवर जोरदार प्रहार केलाच. बच्चू कडूंनी नवनीत राणांच्या विरोधात उमेदवार दिला आहे. त्यामुळे अमरावतीत महायुती, महाविकास आघाडी आणि प्रहार अशी तिरंगी लढत होताना पाहायला मिळणार आहे. बघा काय म्हणाले रवी राणा….
Published on: Apr 04, 2024 03:09 PM
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
