नवनीत राणांचा लोकसभा लढवण्याचा मार्ग मोकळा, जात प्रमाणपत्र कोर्टानं ठरवलं वैध
नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र संदर्भात बहुचर्चित असलेला निकाल न्यायालयाकडून गुरुवारी आला आहे. त्यामुळे नवनीत राणांचा लोकसभा लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल दिला होता. तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत त्यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे.
अमरावती येथील खासदार नवनीत राणांना आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र संदर्भात बहुचर्चित असलेला निकाल न्यायालयाकडून गुरुवारी आला आहे. त्यामुळे नवनीत राणांचा लोकसभा लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल दिला होता. तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत त्यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे. २०१३ मध्ये नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र मिळाले होते. नवनीत राणा यांना मोची जातीचे प्रमाणपत्र दिले होते. जात पडळताडणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र वैध ठरवले होते. त्याविरोधात माजी खासदार आनंदराव अडसूळ उच्च न्यायालयात गेले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने जात पडळताडणी समितीचा निर्णय रद्द करत राणा यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. त्या मोची नसून पंजाबी चर्मकार असल्याचा दावा याचिकाकर्ते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला होता.