MP Omraje Nimbalkar Rescues : खासदार असावा तर असा! पुरात अडकलेल्यांच्या मदतीसाठी ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात अन्…
धाराशिवमधील पुरात अडकलेल्या एका आजी आणि नातवाला खासदार ओमराज निंबाळकर यांनी वाचवले. एनडीआरएफच्या मदतीने त्यांनी दोघांना सुरक्षित बाहेर काढले. या घटनेची माहिती ओमराज निंबाळकर यांनी स्वतःच्या फेसबुकवर दिली आहे.
धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण केली आहे. झालेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान धाराशिव येथील पूरस्थितीत अडकलेल्या एका वृद्ध महिले आणि तिच्या नातवाला खासदार ओमराज निंबाळकर यांनी धाडसीपणे वाचवले. ओमराज निंबाळकर यांनी स्वतः पुराच्या पाण्यात उतरून, स्थानिक यंत्रणा आणि एनडीआरएफच्या मदतीने आजी-नातवाला सुरक्षित बाहेर काढले. त्यांनी या घटनेची माहिती फेसबुकवर एका पोस्टद्वारे दिली आहे. महाराष्ट्रातील अनेक भाग या मुसळधार पावसामुळे प्रभावित झाले असून, अहमदनगर, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना विशेषतः मोठा फटका बसला आहे. खासदार निंबाळकर यांच्या या धाडसी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

