किडनीत शिंदे गट आणि लिव्हरमध्ये… ओमराजे निंबाळकरांचा मल्हार पाटलांना खोचक टोला
राष्ट्रवादीचे उमेदवार अर्चना पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी मोठा गौप्यस्फ़ोट केला. 2019 ला अजित पवार यांच्या सहमतीने डॉ पाटील परिवाराने राष्ट्रवादी सोडत भाजपात प्रवेश केला. तर नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून आणि अजित पवार यांच्या सहमतीने आम्ही 2019 ला राष्ट्रवादी सोडली. आमच्या रक्तात राष्ट्रवादी आहे आणि हृदयात भाजप...असं वक्तव्य केलं.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अर्चना पाटील आणि पुत्र मल्हार पाटील यांना टोला लगावल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे उमेदवार अर्चना पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी मोठा गौप्यस्फ़ोट केला. 2019 ला अजित पवार यांच्या सहमतीने डॉ पाटील परिवाराने राष्ट्रवादी सोडत भाजपात प्रवेश केला. तर नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून आणि अजित पवार यांच्या सहमतीने आम्ही 2019 ला राष्ट्रवादी सोडली. आमच्या रक्तात राष्ट्रवादी आहे आणि हृदयात भाजप तर हातात धनुष्यबाण आहे, असं मल्हार पाटील यांनी म्हटले होते. मल्हार पाटील यांच्या वक्तव्यावर खासदार ओमराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी पाटील परिवारावर टीका करत असे म्हटले की, राष्ट्रवादी का वाढवू यावर अजित दादा यांनी कमळाने यांना हाणले असेल. रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप असे मल्हार पाटील म्हणतात तर किडनीत शिंदे गट आणि लिव्हरमध्ये मनसे टाका म्हणजे शरीरात सगळे पक्ष गेले की कोणत्याही पक्षात जायला मोकळे, असा खोचक टोलाही ओमराजे निंबाळकर यांनी लगावला. लोकांना गृहीत धरून राजकारण केले तर या गद्दारांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

