बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या प्रचारास उदयनराजे भोसले भावूक, म्हणाले; तर मी राजीनामा देऊन…
भाषणाच्या सुरूवातीला गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने राजेंना अश्रू अनावर झालेत. त्यांना पाहून पंकजा मुंडे देखील भावूक झाल्यात. यासह पंकजा मुंडे यांच्या खासदारकीवरून उदयनराजे भोसले यांनी हशाही पिकवला. उदयनराजे भोसले यांनी पंकजा मुंडे यांना खासदार करण्याचं आवाहन केलं.
बीडमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला. बीडमध्ये येत्या १३ तारखेला लोकसभेचं मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्या सांगता सभेला खासदार उदयनराजे भोसले यांनी हजेरी लावली. यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने भावूक झालेत. भाषणाच्या सुरूवातीला गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने राजेंना अश्रू अनावर झालेत. त्यांना पाहून पंकजा मुंडे देखील भावूक झाल्यात. यासह पंकजा मुंडे यांच्या खासदारकीवरून उदयनराजे भोसले यांनी हशाही पिकवला. उदयनराजे भोसले यांनी पंकजा मुंडे यांना खासदार करण्याचं आवाहन केलं. तर अजित पवार यांनी थेट मंत्रीपदासाठी थेट शिफारस करणार असं म्हटलं. तर पुण्यातील पत्रकार परिषदेतून देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला. बीडमधून भाजपकडून पंकजा मुंडे यांच्यावरोधात शरद पवार यांच्या गटाचे बजरंग सोनवणे अशी लढत रंगणार आहे. त्यामुळे जनता कुणाला आपला कौल देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अजित पवारांच्या पक्षात नाराजीचं वादळ? पवार घेणार कोअर कमिटीची बैठक
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
