AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक

| Updated on: Aug 26, 2026 | 3:17 PM
Share

मुंबई: एमपीएससीच्या औषध निरीक्षक (Drug Inspector) पेपरफुटी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांसह एकूण सहा जणांना अटक केली आहे. या प्रकरणात क्लासचालक, संबंधित विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांचाही समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या सहाही आरोपींना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मागील काही […]

मुंबई: एमपीएससीच्या औषध निरीक्षक (Drug Inspector) पेपरफुटी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांसह एकूण सहा जणांना अटक केली आहे. या प्रकरणात क्लासचालक, संबंधित विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांचाही समावेश आहे.

अटक करण्यात आलेल्या सहाही आरोपींना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या तपासानंतर ही पहिली मोठी कारवाई मानली जात आहे.

दरम्यान, सुरुवातीला एमपीएससीकडून पेपरफुटी नाकारण्यात आली होती. मात्र विद्यार्थ्यांनी सादर केलेले पुरावे आणि तक्रारीनंतर तपासाला वेग आला. आता हे रॅकेट नेमकं कसं कार्यरत होतं आणि पेपरफुटीची साखळी काय होती, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.

Published on: Aug 26, 2026 03:17 PM

Follow Us