AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis | MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...

Devendra Fadnavis | MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत…

| Updated on: Jul 16, 2026 | 1:00 PM
Share

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-अ, गट-ब आणि गट-क पदभरतीच्या पूर्व MPSC परीक्षा संगणकआधारित म्हणजेच CBT पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

विद्यार्थ्यांच्या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी CBT पद्धतीची अंमलबजावणी तात्पुरती पुढे ढकलण्याचा सल्ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिला आहे. यानुसार, गट-अ, गट-ब आणि गट-क पदभरतीच्या परीक्षा ऑगस्ट 2027 पर्यंत पूर्वीप्रमाणेच ऑफलाइन पद्धतीने घेण्याचं सांगितलं आहे. याबैठकीत प्रशासन- विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी उपस्थि होते.

Published on: Jul 16, 2026 01:00 PM

Follow Us