MPSC Student Protest : राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
MPSC Student Protest In Pune : पुण्यात आज स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी राज्य सेवा आयोगाच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले आहेत.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि आयोगाचा संघर्ष हा सातत्याने सुरूच आहे. आज पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले बघायला मिळाले आहेत. राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकल 12 मार्चला लागलेला आहे. या जाहीर झालेल्या निकालात काही तांत्रिक चुका होत्या. हा निकाल जाहीर होण्याच्या आधीच आयोगाला काही विद्यार्थ्यांनी मेल केला होता. या चुका आयोगाने दुरुस्त न केल्यामुळे त्याच तांत्रिक चुकांसह सारखाच कट ऑफ ईडब्ल्यूएस ओपनचा लागला. या तांत्रिक चुकांबद्दल राज्य सेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेले आहेत.
Published on: Apr 06, 2025 10:22 PM
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

