MSRTC Bus : ऑन ड्युटी ‘लालपरी’त चढली झिंग… दारूच्या नशेत चालक अन् वाहक, पुढे काय घडलं बघा Video
पंढरपूरवरून निघालेल्या एसटी बसचा वाहक नशा चढल्याने गाडीतच लोळत पडला होता, तर चालक बस सुरक्षितरीत्या चालवू शकत नव्हता. यामुळे बसमधील महिला व वृद्ध प्रवासी घाबरले. काही प्रवाशांनी आपल्या नातेवाइकांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली.
पंढरपूरवरून निघालेल्या एसटी बसमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंढरपूरवरून निघालेल्या एसटी बसचे चालक आणि वाहकाने दारूच्या नशेत असल्याचे पाहायला मिळालंय. दारूच्या नशेत असताना चालकाने बस चालवल्याची गंभीर घटना गुरुवारी रात्री बीड जिल्ह्यात घडली. या प्रकारामुळे 37 प्रवाशांचा जीव धोक्यात आला. या प्रकारानंतर संतप्त प्रवाशांच्या तक्रारीनंतर बीड पोलीस आणि एसटी प्रशासनाने चालक-वाहकाला ताब्यात घेतले असून, त्यांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळतेय. पंढरपूरवरून अकोट आगाराची बस अकोल्यातील अकोटकडे येत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोट आगाराची MH -14-6140 क्रमांकाची बस पंढरपूरहून अकोटकडे प्रवास येत होती. चालक संतोष रहाटे आणि वाहक संतोष झाल्टे हे दोघं या बसमध्ये ड्युटीला होते. गुरुवारी दुपारी 4 वाजता बस पंढरपूरहून निघाली होती. बसमध्ये महिला-पुरुष असे एकूण 37 प्रवासी होते, त्यात दोन लहान मुलांचाही समावेश होता. बस निघतानाच चालक व वाहक दारूच्या नशेत असल्याचा संशय प्रवाशांना आला आणि हा प्रकार उघड झाला. या घटनेमुळे राज्य परिवहन विभागाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?

