MSRTC : लालपरीच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, एसटी बस आता स्मार्ट होणार, कोण-कोणत्या सुविधा मिळणार?
बस चालवताना चालक मोबाइलवर असल्याच्या घटना देखील समोर आल्या होत्या. त्याला आळा घालण्यासाठी चालकाच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीवर देखील हा ‘तिसरा डोळा’ लक्ष ठेवून असणार आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी आणि रस्ता तिथं एसटी या ब्रीद वाक्याप्रमाणे आजही राज्यातील अनेक प्रवाशी हे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने प्रवास करतात. काही गावात तर एसटी शिवाय तिथे पोहचण्यासाठी इतर कोणताही पर्याय उपलब्ध नाही. अशातच सुरक्षित प्रवासाबरोबरच एसटी प्रवाशांना वक्तशीर सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या ‘स्मार्ट बसेस’ लवकरच एसटीच्या ताफ्यात येणार असून त्या रस्त्यावर धावताना दिसणार आहे. या नव्या स्मार्ट बसमध्ये फोम आधारित अग्निशमन यंत्रणेसह सीसीटीव्ही आणि जीपीएस सुविधा देखील असणार आहे. यासंदर्भातील एक घोषणा देखील राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
नवीन सर्व बसमध्ये ‘एआय’वर आधारित कॅमेरे, जीपीएस, एल. ई. डी. टीव्ही, वाय-फाय, चोरी – प्रतिबंध तंत्रज्ञानावर आधारित बस लॉक सिस्टम, असे अत्याधुनिक तंत्रज्ञान या स्मार्ट बसमध्ये असणार आहे. तर चालकाच्या बस चालविण्याच्या पद्धतीवरही एक कॅमेरा लक्ष ठेवणार असून बसस्थानक व परिसरात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बस पूर्णतः बंद राहतील, अशी यंत्रणा बसमध्ये बसविण्यात येणार आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

