MSRTC : कोकणातून येणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशाला कात्री, लालपरी दरवाढीचा प्रवाशांना फटका, कुठं किती वाढलं भाडं?

रत्नागिरी जिल्ह्यात मध्यरात्रीपासून एसटीची हंगामी भाडेवाढ लागू. हंगामी भाडेवाढ लागू झाल्याने कोकणातून येणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशाला लागणार कात्री. राज्य परिवहन एसटी महामंडळाकडून करण्यात येणाऱ्या हंगामी भाडेवाढीमुळे रत्नागिरी मुंबई प्रवास ५० रुपयांनी महागला

MSRTC : कोकणातून येणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशाला कात्री, लालपरी दरवाढीचा प्रवाशांना फटका, कुठं किती वाढलं भाडं?
| Updated on: Nov 08, 2023 | 2:16 PM

रत्नागिरी, ८ नोव्हेंबर २०२३ | रत्नागिरी जिल्ह्यात मध्यरात्रीपासून एसटीची हंगामी भाडेवाढ लागू होणार आहे. हंगामी भाडेवाढ लागू झाल्याने कोकणातून येणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशाला लागणार कात्री बसणार आहे. राज्य परिवहन एसटी महामंडळाकडून करण्यात येणाऱ्या हंगामी भाडेवाढीमुळे रत्नागिरी मुंबई प्रवास ५० रुपयांनी महागला आहे. रत्नागिरी-मुंबई असा प्रवास करण्यासाठी पूर्वी ५२५ रुपये लागत होते ते आता ५७५ रुपये मोजावे लागणार आहे. रत्नागिरी-बोरिवली ५५० ऐवजी आता ६०६ रूपये, रत्नागिरी-ठाणे ५०५ ऐवजी आता ५६० रुपये, राजापूर-मुंबईसाठी ५९५ रुपये आता ६५५ रुपये, लांजा-बोरिवलीसाठी पूर्वी ५५७ रुपये आता ६३५ रुपये मोजावे लागणार आहेत. ७ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर पर्यत ही दरवाढ असणार आहे. हिवाळी सुट्टीसाठी येणाऱ्या पर्यटकांना लालपरी भाडेवाढीचा मोठा झटका बसणार आहे.

Follow us
जयंत पाटलांच्या पराभवाचा आनंद 'या' आमदारानं चिखलात लोळून लुटला
जयंत पाटलांच्या पराभवाचा आनंद 'या' आमदारानं चिखलात लोळून लुटला.
कोकणाच्या सौंदर्याची भुरळ प्राण्यांनाही..भातशेतात मोरांचा मुक्त संचार
कोकणाच्या सौंदर्याची भुरळ प्राण्यांनाही..भातशेतात मोरांचा मुक्त संचार.
रत्नागिरीत धुव्वाधार बॅटिंग, 24 तासात इतक्या पावसाची नोंद, IMDचा अलर्ट
रत्नागिरीत धुव्वाधार बॅटिंग, 24 तासात इतक्या पावसाची नोंद, IMDचा अलर्ट.
कल्याण-डोंबिवलीकरांना मुसळधार पावसानं झोडपलं, 'या' भागात गुडघाभर पाणी
कल्याण-डोंबिवलीकरांना मुसळधार पावसानं झोडपलं, 'या' भागात गुडघाभर पाणी.
राऊतच्या डोक्यावर परिणाम, तो पागल..; 'त्या' आरोपांवर शिरसाटांचा पलटवार
राऊतच्या डोक्यावर परिणाम, तो पागल..; 'त्या' आरोपांवर शिरसाटांचा पलटवार.
राज्यात मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार की नाही? OBC नेत्यानं...
राज्यात मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार की नाही? OBC नेत्यानं....
अरे भाई ये क्या है... मुंबईची लाईफ-लाईन लिकेज, लोकलमधून पावसाच्या धारा
अरे भाई ये क्या है... मुंबईची लाईफ-लाईन लिकेज, लोकलमधून पावसाच्या धारा.
'लाडकी बहीण'बद्दल सगळं काही... प्रत्येक महिला लाभार्थी व्हावी म्हणून..
'लाडकी बहीण'बद्दल सगळं काही... प्रत्येक महिला लाभार्थी व्हावी म्हणून...
राजकारणातील चाणाक्य कोण? शरद पवार की अजितदादा? विधानभवनासमोर झळकल बॅनर
राजकारणातील चाणाक्य कोण? शरद पवार की अजितदादा? विधानभवनासमोर झळकल बॅनर.
इगतपुरीतील धबधबे पर्यटकांना खुनावताय, बघा फेसाळणाऱ्या सूनकडाचं सौंदर्य
इगतपुरीतील धबधबे पर्यटकांना खुनावताय, बघा फेसाळणाऱ्या सूनकडाचं सौंदर्य.