MSRTC : एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून आंदोलन, एसटीच्या ‘या’ युनिअननं पुकारला संप
Msrtc Strike Employee Of ST : ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वातील एसटी कष्टकरी जनसंघातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. मात्र हे आंदोलन फोल ठरलं मात्र यानंतर आता कोण उतरलं रस्त्यावर?
मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३ | गेल्या काही दिवसांपासून ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर जाणार असल्याची चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. काल गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वात एसटी कष्टकरी जनसंघातील कर्मचारी सातव्या वेतनाच्या मागणीसह इतर काही मागणीसाठी आंदोलन करणार होते. मात्र गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वातील आंदोलनाला काही एसटी कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिला नसल्याने ते आंदोलन फोल ठरलं. अशातच सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचं आजपासून आंदोलन सुरू होतंय. मुंबईतील आझाद मैदानात विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्याने राज्यातील राज्य परिवहन महामंडळाची अर्थात एसटी बसची वाहतूक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नववधू प्रिया मी बावरते.. प्राजक्ता माळीची लगीनघाई?

हर पल पर पल, नुसरत भरूचाच्या लुकसोबत कॅप्शनची चर्चा

Avneet Kaur: लाल ड्रेसमध्ये अवनीत कौरचा रेड अलर्ट, फोटो चर्चेत

भोजपुरी क्वीन नेहा मलिकचा बोल्ड अंदाज, फोटो पाहून...

ये आँखे ये मस्ती, आमना शरीफचा बीच लुक, चाहते फिदा

Adaa Khan: अदा हाय अदा, होश उड़ाए अदा कर दे दीवाना
Latest Videos