आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात, पोलिसांच्या वाहनाची बसली धडक
जळगावच्या मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात.... चंद्रकांत पाटील यांच्यासह दोन पोलीस कर्मचारीदेखील किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू आहे. चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस गाडी धडकल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती मिळतेय.
जळगावच्या मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात चंद्रकांत पाटील हे किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासह दोन पोलीस कर्मचारीदेखील किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू आहे. चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस गाडी धडकल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती मिळतेय. या अपघातात पोलिसांच्या गाडीचं बोनेटचं नुकसान झालं आहे. पण सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चंद्रकांत पाटील हे अपघातातून सुखरुप आहेत. घडलेल्या अपघातानंतर संबंधित घटनेची दखल तातडीने प्रशासन आणि पोलिसांकडून घेण्यात आली. या अपघातात पोलिसांच्या गाडीचं बोनेटचं नुकसान झालं आहे आणि सर्वजण सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग

