MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 19 July 2021

मुसळधार पावसाने महाराष्ट्रातील बहुतांश भागात हाहाकार केला आहे. हवामान खात्यानं मुंबईसह कोकणाला रेड अलर्ट दिला आहे.

दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे मुंबईसह कोकणाला झोडपून काढले आहे. मुंबई शहरासह उपनगरातील अनेक भागात पाणीही साचलं आहे. हवामान खात्याने मुंबईसह कोकणाला रेड अलर्ट दिला आहे. पुढील पाच ते सहा दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशार देण्यात आला असून नागरिकांना सावधानतेचा इशार दिला आहे.