Ajit Pawar : अध्यक्ष महोदय… बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील… अजित पवार असं का म्हणाले? काय केली मागणी?
अरबी समुद्रातील बुचर आयलंड परिसरात ‘नीलकमल’ कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिली. त्यामुळे भीषण अपघात झाला. बुधवारी दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी ही दुर्घटना घडली.
मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट गेट वे ऑफ इंडियाजवळ काहिशी बुडाली. अरबी समुद्रातील बुचर आयलंड परिसरात ‘नीलकमल’ कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिली. त्यामुळे भीषण अपघात झाला. बुधवारी दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी ही दुर्घटना घडली. यामध्ये १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, या बोट दुर्घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना केंद्र आणि राज्य सरकारकडून ७ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर आतापपर्यंत १०१ जणांना वाचवण्यात यश आलं असून बेपत्ता झालेल्या लोकांची माहिती उद्यापर्यंत मिळेल असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या घटनेसंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं. ‘मी आठ वेळा सभागृहात निवडून आलोय. आपली मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. आपल्याच मतदारसंघात ती लोकं बोटीत बसली आहेत. त्यातील १३ लोकांचा मृत्यू झाला. अधिवेशन सुरू असताना अशाप्रकारची घटना घडली असताना अध्यक्षांना अधिकार असतो की, बाकीचे कामकाज बाजूला ठेऊन ज्यांचे जीव गेलेत तो मुद्दा सभागृहात मांडला गेला पाहिजे.’, असे अजित पवार म्हणाले. सभागृहात नेमकं काय झालं बघा व्हिडीओ?
Published on: Dec 19, 2024 02:25 PM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
