अंगावर रंगरंगोटी, हातात मनसेचा झेंडा; राज ठाकरेंच्या सभेसाठी कार्यकर्ते मुंबईत दाखल
Raj Thackeray Sabha : छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मनसेचा आज मेळावा होणार आहे. या मेळाव्याला राज ठाकरे संबोधित करणार आहेत. या सभेसाठी राज्यभरातून मनसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. पाहा...
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मनसेचा आज मेळावा होणार आहे. या मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सभेसाठी राज्यभरातून मनसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. भगव्या रंगांची अंगावर रंगरंगोटी करून मनसैनिक मुंबईत दाखल झालेत. पालघरचे कार्यकर्तेही दादरच्या शिवतीर्थवर पोहचले आहेत. यातील एका कार्यकर्त्याने अंगावर भगव्या रंगाने ‘ठाकरेशाही’ असं लिहिलं आहे. तर काळ्या रंगाची रंगरंगोटी केलेल्या कार्यकर्त्याच्या अंगावर ‘हुकूमशाही’ असं लिहिण्यात आलं आहे. ठाकरेशाही आसूड मारत हुकूमशाही संपवणार, असं हे कार्यकर्ते म्हणत आहेत. महाराष्ट्रात हुकूमशाही नाही तर ठाकरेशाही चालणार, असे बॅनर लावून कार्यकर्ते मुंबईत आले आहेत. राज ठाकरे जो आदेश देतील तो आम्ही पाळणार अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

