MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 25 October 2021

सत्र न्यायालयानं वानखेडे यांची याचिका फेटाळून लावली आहे. तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते उच्च न्यायालयात सांगा. सत्र न्यायालयासाठी हे प्रकरण पूर्णपणे संपलं आहे, असं सत्र न्यायालयाने म्हटलं आहे.

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना पहिला धक्का बसला आहे. प्रभाकर साईल याने केलेले आरोप ग्राह्य धरु नये, यासाठी वानखेडे यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. हायकोर्टात प्रकरण असल्यामुळे सुनावणीला सत्र न्यायालयानं नकार दिला आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

वानखेडे यांनी सत्र न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. वैयक्तीक बदनामी केली जात आहे. सोशल मीडियावर कुटुंबियांची खासगी माहिती उघड केली जात आहे. याबाबत त्यांनी एक प्रतिज्ञापत्र साद करुन तीन मागण्या केल्या होत्या. या सगळ्याचा परिणाम तपासावर होत असल्याचंही वानखेडे यांनी त्यात म्हटलं आहे. त्यामुळे तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, सत्र न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे. तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते उच्च न्यायालयात सांगा. सत्र न्यायालयासाठी हे प्रकरण पूर्णपणे संपलं आहे, असं सत्र न्यायालयाने म्हटलं आहे. दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्यानंतर आता समीर वानखेडे उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI