MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 27 October 2021
मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणात आज सुनावणी दरम्यान न्यायालयाची वेळ संपल्यानं या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यन खानला आजची रात्रही जेलमध्ये काढावी लागणार आहे.
बॉलिवुड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणात आजची रात्रही आर्थर रोड कारागृहातच काढावी लागणार आहे. कारण, या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत आज आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी अरबाज मर्चंटचे वकील अमित देसाई आणि मुनमुनचे वकील अली कशिफ यांनी युक्तीवाद केला. आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद पूर्ण झाल्या असला तरी अद्याप एनसीबीच्या वकीलांचा युक्तीवाद बाकी आहे. मात्र, न्यायालयाची वेळ संपल्यानं या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यन खानला आजची रात्रही कारागृहातच काढावी लागण्याची शक्यता आहे.
Follow Us
Latest Videos
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय

