CM Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बाप्पाला निरोप, ‘वर्षा’वर विसर्जन संपन्न
गणपती विसर्जन सोहळ्यानिमित्त गणेश मंडळासह पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून गणपती मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अशातच घरगुती आणि सार्वजनिक मंडळाच्या बाप्पांना निरोप देण्यात येतोय
अनंत चतुर्थीनिमित्त आज शनिवारी मुंबईसह राज्यभरातील गणरायांचे विसर्जन होत आहे. ढोल ताशांच्या गजरात आणि गुललाची उधळण करत बाप्पाला निरोप देण्यात येतोय. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या घरच्या बाप्पाला जड अंतकरणाने निरोप दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शासकीय वर्षा या निवासस्थानी आपल्या बाप्पाचं विसर्जन केलं. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते त्यांनी आपल्या बाप्पाचं विसर्जन केलं. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन करत निरोप दिल्याचे पाहायला मिळाले.
Published on: Sep 06, 2025 05:26 PM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

