Mumbai Ganpati Visarjan 2025 : ओहss भारीच…अशी झाली परळचा सम्राट अन् परळच्या महाराजाची भेट!
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या याच जयघोषात आज लाडक्या गणरायाला निरोप दिला जाणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या बाप्पाची दहा दिवस भक्तीभावाने पूजा करण्यात आली. यानंतर आज विसर्जन सोहळ्याची लगबग अन् तयारी पाहायला मिळतेय
आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला निरोप दिला जात आहे. मुंबईतील गणपती मंडळापैकी प्रमुख आकर्षण असलेल्या लालबागचा राजा, मुंबईचा राजा (गणेश गल्ली), चिंचपोकळीचा चिंतामणी, परळचा राजा, खेतवाडीचा महाराजा हे विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाले आहेत. मुंबईत गणपती विसर्जनाची धामधूम सुरु असताना दुसरीकडे या सोहळ्याला पावसानेही हजेरी लावली आहे. मुंबईत आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असला तरी भक्तांचा उत्साह मात्र तसाच कायम आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषांनी मुंबईतील ठिकठिकाणचे रस्ते दुमदुमले आहेत. तर मुंबईतील सार्वजनिक मंडळांचे गणपती बाप्पा सकाळी दहा वाजेनंतर शेवटची आरती केल्यानंतर विसर्जनासाठी मार्गस्थ झाले असताना परळचा सम्राट आणि परळच्या महाराजा या गणपती बाप्पांची मिरवणुकीदरम्यान भेट झाल्याचे पाहायला मिळाले.
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी

