Lalbaugcha Raja Visarjan 2025 : ही शान कोणाची…. लालबागच्या राजाची… शाही मिरवणुकीतील डोळ्यांचं पारणं फेडणारे क्षण
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील गणपती विसर्जन सोहळा मोठ्या थाटामाटात सुरु आहे. त्यातच असंख्य लोकांचे श्रद्घास्थान असलेल्या लालबागचा राजा गणपती विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली असून हळू हळू राजा पुढे पुढे सरकत आहे.
गणेशोत्सवातील दहा दिवस मनोभावे पूजा, अर्चना आणि प्रार्थना केल्यानंतर आता सर्व मुंबईकर आपल्या लाडक्या बाप्पााला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत. भक्तीमय वातावरणात आणि साश्रू नयनांनी गणपती बाप्पााला निरोप दिला जात आहे. नवसाला पावणारा राजा अशी ओळख असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. या विसर्जन मिरवणुकीत अनेक लोक सहभागी होत असतात. दहा दिवस ज्यांनी मंडपात जाऊत लालबागच्या राजाचं दर्शन घेता आलं नाही, ते लोकं आपल्या लाडक्या राजाला शेवटचं पाहण्यासाठी या मिरवणुकीत दाखल होत असतात. दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक काढली जाते. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक शुक्रवार ६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ च्या आसपास सुरु करण्यात आली. यावेळी मंडळाच्या प्रांगणातून ढोल-ताशांचा गजरात गुलालाची उधळण करत लाखो भक्त राजाला निरोप देत आहे. बघा शाही मिरवणुकीतील काही खास क्षण
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

