Lalbaugcha Raja Visarjan 2025 : पालखी निघाली राजाची… लालबागच्या राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, असा दिला जातोय निरोप
गरीब असो किंवा श्रीमंत, तरुण असो किंवा वृद्ध, सर्वांनाच बाप्पाच्या दर्शनाची आणि त्याच्या मिरवणुकीत सहभाग घेण्याची तीव्र इच्छा असते. उद्योग क्षेत्र, बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनीही यावर्षी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय तर आज त्याला निरोप दिला जातोय
लालबागचा राजा. हे नाव ऐकल्यावरच मुंबईकरांच्या मनात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. गणेशोत्सवात लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी करोडो लोक मुंबईत दाखल होतात. तर राजाचा सर्वात भव्य विसर्जन सोहळा दरवर्षी लाखो लोकांना एकत्र आणतो. यावर्षीच्या गणेशोत्सवातही लालबागच्या राजाच्या विसर्जनाची मिरवणूक मोठ्या उत्साहाने आणि भक्तीने पार पडतेय.
राजाची विसर्जन मिरवणूक चिंचपोकळीच्या पुलापासून सुरू होऊन भायखळा, नागपाडा चौक, ओपेरा हाऊस ब्रिज आणि अखेर गिरगाव चौपाटी अशी असणार आहे. या संपूर्ण मार्गावर बाप्पाचं अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात येतंय. फुलांचा वर्षाव, भक्तीमय गीते आणि जयघोष याने वातावरण आनंदमय बनलंय. मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या लोकांच्या चेहऱ्यावर असलेला उत्साह आणि श्रद्धा पाहूनच या सोहळ्याचं महत्त्व लक्षात येतं. या मिरवणुकीत केवळ मुंबईकरच नाही, तर महाराष्ट्राच्या विविध भागांतूनही लोक येतात. विशेष म्हणजे, लालबागच्या राजाच्या विसर्जनात सर्व जाती-धर्माचे लोक सहभागी होतात. हे या सोहळ्याचे एक वैशिष्ट्य आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

