Mumbai Ganpati Visarjan 2025 : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी निघाला… मिरवणुकीत गुलालाची उधळण अन् भक्तांचा जल्लोष
चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळानं शिवकालीन राजमहालाचा भव्य देखावा यंदा साकारला होता. या देखाव्याच्या केंद्रस्थानी भव्य दिव्य सिंहासन होतं. ज्यावर चिंतामणी विराजमान झाला होता. आज विसर्जनासाठी हा बाप्पा मार्गस्थ झालाय
गेल्या दहा दिवसांपासून मनोभावे केलेली पूजा अर्जना यानंतर आज चिंचपोकळीच्या चिंतामणीला जड अंतकरणाने निरोप देण्यात येणार आहे. चिंचपोकळीचा चिंतामणीची अखेरची आरती झाल्यानंतर चिंतामणी मंडपातून बाहेर पडला असून विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झालाय. चिंचपोकळीचा चिंतामणी हा मुंबईतील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित गणेश मंडळांपैकी एक असून दरवर्षी लाखो भक्त चिंतामणीच्या दर्शनासाठी दाखल होत असतात. यंदाच्या वर्षी चिंतामणीसाठी संभाजी महाराजांच्या बलिदानाला समर्पित देखावा कऱण्यात आलाय. यामुळे या मंडळाचे आकर्षण आणखी वाढल्याचे पाहायला मिळाले. चिंतामणीच्या देखाव्याने भाविकांसह इतिहासप्रेमींचं लक्ष वेधून घेतले होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने साकारण्यात आलेला हा देखावा शिवकालीन संस्कृती आणि संभाजी महाराजांच्या शौर्याला मानवंदना देणारा ठरलाय.

