AC Local वर पुन्हा दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
VIDEO | मुंबई लोकलवर समाजकंटकाकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. चर्चगेट ते विरार रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या एसी जलद लोकलवर समाजकंटकाकडून तुफान दगडफेक करण्यात आली. आज दुपारी ३ वाजून ३८ मिनिटांनी ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. नेमकं काय घडलं?
मुंबई, 2 ऑक्टोबर 2023 | मुंबई लोकलवर समाजकंटकाकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. चर्चगेट ते विरार रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या एसी जलद लोकलवर ही दगडफेक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवली रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. आज दुपारी ३ वाजून ३८ मिनिटांनी ही घटना घडली असून या दगडफेकीत एसी लोकलच्या पाच ते सहा खिडक्या तुटल्या असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. मात्र सुदैवाने या दगडफेकीच्या घटनेत कोणत्याही रेल्वे प्रवाशाला जखम किंवा कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भात बोरिवली लोहमार्ग पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली आहे.
Latest Videos
Latest News