Mumbai local Mega Block : मुंबईकरांनो उद्या मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर प्रवास करताय? होणार गैरसोय कारण…
मुंबईकरांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही उद्या रविवारी २९ जून रोजी लोकल ट्रेननं प्रवास करणार असाल तर कोणत्या स्थानकावर कधी मेगाब्लॉक आहे? याची माहिती घेऊनच प्रवास करा नाहीत तुमची गैरसोय होऊ शकते.
उद्या रविवारी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १०.४० ते दुपारी ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर अप आणि डाऊन असा जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सीएसएमटी आणि दादरवरून सुटणाऱ्या डाऊन मेल एक्स्प्रेस ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान पाचव्या मार्गावर वळवल्या जाणार आहे. तर हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत पनवेल आणि सीएसएमटी दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेल-ठाणे मार्गावर लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ शकते.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?

