सिलिंडर स्फोटात 72 तासानंतर मुंबई महापौर पोहोचतात, एवढे तास कुठे होतात?

वरळीतील बीडीडी चाळीतील सिलिंडर स्फोटातील जखमींना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले.

मुंबईः वरळीतील बीडीडी चाळीतील सिलिंडर स्फोटातील जखमींना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. या घटनेत चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला तसेच बाळापाठोपाठ वडिलांचाही मृत्यू झाला. मुंबईच्या महापौर मात्र 72 तास उलटल्यानंतर रुग्णालयात पोहोचल्या. यावर भाजप नेते आशीष शेलार यांनी संताप व्यक्त केला आहे. एवढा वेळ मुंबईच्या महापौर कुठे होत्या, त्यांना या घटनेची जराही खबर नव्हती का, असा संतप्त सवाल आशीष शेलार यांनी केला.

Published On - 12:58 pm, Sat, 4 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI