मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
मुंबईकरांच्या घरगुती बजेटवर पुन्हा महागाईचा फटका बसणार आहे. मुंबई दुग्ध उत्पादक संघाने १ सप्टेंबर २०२६ पासून सुट्या दुधाच्या घाऊक दरात प्रति लिटर ९ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या प्रति लिटर ९३ रुपये असलेला घाऊक दर वाढीनंतर १०२ रुपये होणार असून, हे नवे दर १ सप्टेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत लागू […]
मुंबईकरांच्या घरगुती बजेटवर पुन्हा महागाईचा फटका बसणार आहे. मुंबई दुग्ध उत्पादक संघाने १ सप्टेंबर २०२६ पासून सुट्या दुधाच्या घाऊक दरात प्रति लिटर ९ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या प्रति लिटर ९३ रुपये असलेला घाऊक दर वाढीनंतर १०२ रुपये होणार असून, हे नवे दर १ सप्टेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत लागू राहतील.
पशुखाद्याच्या किंमतीत सुमारे २५ टक्के वाढ, जनावरांच्या देखभालीचा वाढलेला खर्च आणि एफडीएच्या कारवाईनंतर शुद्ध दुधाची वाढलेली मागणी ही दरवाढीची प्रमुख कारणे असल्याचे सांगण्यात आले आहे.
Published on: Aug 28, 2026 10:09 AM
Follow Us
Latest Videos
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी शिंदेंचा संवाद
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत

