मुंबई मनपा समिती अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल, तिजोरीच्या चाव्या कुणाच्या हाती?
मुंबई महापालिकेच्या चार समित्यांच्या अध्यक्षपदासाठी आज अर्ज दाखल होत आहेत. भाजप आणि शिंदे गट सदस्य अर्ज भरणार आहेत. स्थायी समिती, शिक्षण समिती, बेस्ट समितीसाठी उमेदवारांची नावे चर्चेत असून, यामुळे मुंबईच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे जातील हे ठरणार आहे.
मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हाती जाणार, याचा फैसला लवकरच होणार आहे. मुंबई महापालिकेतील चार महत्त्वाच्या समित्यांच्या अध्यक्षपदासाठी आज अर्ज दाखल केले जात आहेत. भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सदस्य आज सकाळी साडेअकरा वाजता हे अर्ज भरतील.
यामध्ये स्थायी समिती आणि शिक्षण समितीसाठी भाजपकडून अर्ज दाखल केले जाणार आहेत. शिक्षण समितीसाठी २६ सदस्य असून, भाजपच्या राजश्री शिरवाडकर यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. स्थायी समितीसाठी २७ सदस्य असून, या पदासाठी भाजपचे प्रभाकर शिंदे आणि मकरंद नार्वेकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
त्याचबरोबर बेस्ट समितीमध्ये १७ सदस्य असून, शिवसेना शिंदे गटाच्या तृष्णा विश्वासराव यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. सुधार समितीच्या अध्यक्षपदाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या सर्व घडामोडींमुळे मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय आणि आर्थिक नियंत्रणाची सूत्रे कोणत्या राजकीय पक्षांकडे जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
युद्धविरामानंतर इराणच्या तेल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट! परिसरात खळबळ
काम करा नाहीतर पद...व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये एकनाथ शिंदेंचा थेट इशारा
राऊतांच्या त्या वक्तव्यावर नवनाथ बन भडकले; म्हणाले, तुम्ही पाकिस्तान..
LPG वाटपाबाबत केंद्राचा मोठा निर्णय, पेट्रोलियम मंत्रालयाकडून...

