Breaking | 1 कोटी लसींसाठी मुंबई पालिकेचं ग्लोबल टेंडर

Breaking | 1 कोटी लसींसाठी मुंबई पालिकेचं ग्लोबल टेंडर (Mumbai Municipal Corporation's global tender for 1 crore vaccines)

मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसींच्या (Corona Vaccine) तुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेने कोरोना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढलं आहे. या टेंडरद्वारे 1 कोटी डोसची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढणारी मुंबई ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे.