Devendra Fadnavis सत्ताप्रेमाने आंधळे झालेले कलयुगातील धृतराष्ट्र | Sushma Andhare -tv9
अंधारे यांनी टीका करताना, देवेंद्र फडणवीस सत्ताप्रेमाने आंधळे झालेले कलयुगातील धृतराष्ट्र असल्याचे म्हटलं आहे.
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा नारळ देवेंद्र फडणवीस यांनी काल फोडला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. दरम्यान आशिष शेलार यांनी फडणवीस म्हणजे श्रीकृष्ण असल्याचे म्हणाले होते. त्यावरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि किरीट सोमैया यांना लक्ष केलं. अंधारे यांनी टीका करताना, देवेंद्र फडणवीस सत्ताप्रेमाने आंधळे झालेले कलयुगातील धृतराष्ट्र असल्याचे म्हटलं आहे. तर फक्त सत्तेसाठी ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून आता खुर्चीवर बसला आहात. तर फडणवीस तुम्ही ज्यांना म्हणता बाहेर काढले ते तर दूशासनाच्या पुढचेही लोक असल्याचे टीका अंधारे यांनी केलेली आहे. त्याचबरोबर आशिष शेलार, किरीट सोमैया ही मंडळी शकुनी मामाच्या भूमिका पार पाडतात असे देखील सुषमा अंधारे म्हणाल्या.
Published on: Aug 21, 2022 11:53 AM
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
