मुंबईतील प्रदूषणाबाबत मार्गदर्शक सूचना जारी; बिल्डर्सला पालिकेचा इशारा
केंद्रीय प्रदूषण बोर्डाने दखल घेतल्यानंतर आता मुंबईतील प्रदूषणाबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. बिल्डर्सला पालिकेचा इशारा देण्यात आला आहे. पाहा व्हीडिओ...
मुंबई : केंद्रीय प्रदूषण बोर्डाने दखल घेतल्यानंतर आता मुंबईतील प्रदूषणाबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. बांधकाम व्यवसायातील धूळ आणि हवेतील बदल या बाबी मुंबईतील प्रदूषणासाठी कारणीभूत असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे हवेतील प्रदूषण नियंत्रणासाठी विभागीय स्तरावर मनपा आत्ता टास्क फोर्सची नेमणुक करणार आहे. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा स्तर सुधारावा म्हणून विभागीय पातळीवर प्रमाणित कार्यपद्धती (स्टॅण्डर्ड ऑपरेटींग प्रोसिजर) अंमलात आणण्याची सुरूवात झाली आहे. मुंबईत सध्या अडीच हजार ठिकाणी इमारत बांधकाम सुरू आहेत. त्यामुळे या बांधकामांच्या अंतर्गत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात धूळ हवेत पसरत आहे. धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक नियम करण्यात आले आहेत. या नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधित जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. असा सूचक इशारा महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी बिल्डर आणि प्रदूषणात वाढ करणाऱ्यांना दिला आहे. याबाबत नियम तयार करण्यात येतील आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर मनपा काय करावाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Published on: Apr 25, 2023 09:49 AM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

