अजितदादा महाराष्ट्रातलं नंबर वन नेतृत्व!, येणार असतील तर त्यांचं स्वागतच; शिवसेना आमदाराचं वक्तव्य
Santosh Bangar on Ajit Pawar : अजितदादा येणार असतील तर आम्ही त्यांचं मोठ्या मनाने स्वागत करू; शिवसेना आमदाराचं वक्तव्य
मुंबई : अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत. त्यावर संतोष बांगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अजितदादा पवार हे महाराष्ट्रातलं नंबर वन नेतृत्व आहे. धडाडीने काम करणारे निडर नेतृत्व आहे. त्यामुळे ते जर राष्ट्रवादी सोडून इथे येत असतील तर आम्ही त्यांचं मोठ्या मनाने स्वागत करू, असं संतोष बांगर म्हणाले आहेत.अजित पवार यांच्यासोबत सर्व आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष फोडायचा ते विषयच नाहीये. पण सर्व आमदारांचं प्रेम अजित पवारांवर आहे आणि याच प्रेमापोटी ते आता बाहेर पडण्याच्या तयारीत दिसतात, असंही बांगर म्हणाले आहेत.
Published on: Apr 18, 2023 02:54 PM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

