अजितदादा पवारसाहेबांच्या शब्दाबाहेर नाहीत; अमोल मिटकरी यांच्याकडून विश्वास व्यक्त
Amol Mitkari On Ajit Pawar : अजित पवार महाराष्ट्राचे नेते आहेत. ते जो निर्णय घेतील त्याच्यासोबत आम्ही आहोतच पण दादा भाजप सोबतच जाण्याचा निर्णय घेतीलच असं कुणी सांगितलं? मिटकरींचा सवाल
मु्ंबई : अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा होतेय. यावर विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वच आमदार अजित दादांच्या जवळचे आहेत. ज्या चर्चा आहेत त्या मिथ्या चर्चा आहेत. भाजपकडून ह्या कंड्या पिकवल्या जातायेत का? हे तपासले पाहिजे. 40 आमदारांचं पत्र देण्याचा प्रश्नच नाही. अजितदादांना भाजपकडून टार्गेट केलं जात आहे. अजितदादा पवारसाहेबांच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत. भाजपचे काही लोक रवी राणांसारखी मंडळी तोंडसुख घेत असतील तर घेऊ द्यावं. वस्तुस्थिती वेगळी आहे. आमदार स्वतःच्या कामाने आले आहेत. अजितदादा देवगिरीला आहेत. त्यांची कामं सुरू आहे, असंही मिटकरी म्हणाले आहेत.

