Mumbai | अविघ्न इमारतीतून 19 मजले खाली उतरत वाचवला जीव

करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आगीची घटना घडली. अग्निशमन दलाने शर्थीच्या प्रयत्नांनी या ठिकाणी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.

मुंबईतील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आगीची घटना घडली . अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या ज्यांनी मोठ्या शर्थीच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. करी रोड परिसरात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न टॉवर या टोलेजंग इमारतीमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. 19 व्या मजल्यावर आग लागल्यानंतर दुरुन आगीचे लोट आणि काळसर धूर दिसत होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI