मुंबईत पोलीस हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या रिवॉल्व्हरमधून झाडल्या स्वत:वर गोळ्या अन्..., कारण नेमकं काय?

मुंबईत पोलीस हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या रिवॉल्व्हरमधून झाडल्या स्वत:वर गोळ्या अन्…, कारण नेमकं काय?

| Updated on: Jan 24, 2025 | 5:57 PM

आपल्या वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळ्या झाडून या मुलाने स्वतःचेच जीवन संपवल्याचे समोर आले आहे. हर्ष म्हस्के असे या मुलाचे नाव असून तो 20 वर्षांचा होता.

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई पोलीस दलातील एका हवालदारच्या मुलाने आत्महत्या केली आहे. आपल्या वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळ्या झाडून या मुलाने स्वतःचेच जीवन संपवल्याचे समोर आले आहे. हर्ष म्हस्के असे या मुलाचे नाव असून तो 20 वर्षांचा होता. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील लोअर परेल परिसरातील एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई पोलीस हवालदाराच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हर्ष म्हस्के असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याने आपल्या पोलीस दलात असलेल्या वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून स्वतःवरच गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. हर्षचे वडील पोलीस हवालदार संतोष म्हस्के हे SP युनिटमध्ये मुंबई पोलीस दलात हवालदार म्हणून काम करतात. सध्या मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक हे त्यांच्या घरी पोहोचले आहे. ते या घटनेची माहिती घेत आहेत. मात्र २० वर्षीय हर्ष म्हस्केने आत्महत्या का केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर या मुलाच्या आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Published on: Jan 24, 2025 05:53 PM