AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Children Hostage : ऑडिशनचं नाव... 3 तास डांबलं अन् मुलांना जाळून टाकण्याची धमकी, पवईत 17 मुलांचं ओलीसनाट्य

Mumbai Children Hostage : ऑडिशनचं नाव… 3 तास डांबलं अन् मुलांना जाळून टाकण्याची धमकी, पवईत 17 मुलांचं ओलीसनाट्य

| Updated on: Oct 30, 2025 | 5:51 PM
Share

मुंबईतील पवई परिसरात रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने आर ए स्टुडिओमध्ये 17 लहान मुलांना तीन तास ओलीस ठेवले. ऑडिशनसाठी बोलावून त्याने मुलांना पेटवून देण्याची धमकी दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत, बाथरूमच्या खिडकीतून प्रवेश करत सर्व मुलांची व एका ज्येष्ठ नागरिकाची सुखरूप सुटका केली. आरोपी रोहित आर्याला अटक करून पुढील तपास सुरू आहे.

मुंबईतील पवई परिसरात एक धक्कादायक घटना घडली, ज्यात रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीने आर ए स्टुडिओमध्ये 17 लहान मुलांना तीन तास ओलीस ठेवले. मुलांना ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते. दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत मुलांना डांबून ठेवल्यानंतर, रोहित आर्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी केला. त्यात त्याने आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास मुलांना आणि स्टुडिओला पेटवून देण्याची धमकी दिली. त्याने स्टुडिओमध्ये रॉकेलही ओतले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पावले उचलली. दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी पोलिसांना याबाबत कॉल आला. रोहित आर्यासोबत बोलणी सुरू असतानाच, पवई पोलिसांनी बाथरूमच्या मागील खिडकीतून आत प्रवेश केला. आत असलेल्या एका व्यक्तीच्या मदतीने पोलिसांनी 17 मुलांसह एक ज्येष्ठ नागरिक आणि एका सामान्य नागरिकाची सुटका केली. पोलिसांनी रोहित आर्याकडून एक एअरगनही जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.

Published on: Oct 30, 2025 05:51 PM