Mumbai Rain | मुंबईत रेड अलर्ट जारी; चेंबूरच्या भरतनगर परिसरात गुडघाभर पाणी

मुंबईत कालपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. चेंबूर, घाटकोपर, कुर्ल्यात मुसळधार पाऊस आहे. तर चेंबूरच्या भरतनगर परिसरात गुडघाभर पाणी साचलं आहे. तसेच, घाटकोपर एन वॉर्डमध्येही घरात पाणी शिरल्याने घरातील सर्व वस्तू पाण्यावर तरंगताना दिसत आहेत.

मुंबईत कालपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. चेंबूर, घाटकोपर, कुर्ल्यात मुसळधार पाऊस आहे. तर चेंबूरच्या भरतनगर परिसरात गुडघाभर पाणी साचलं आहे. तसेच, घाटकोपर एन वॉर्डमध्येही घरात पाणी शिरल्याने घरातील सर्व वस्तू पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तसेच नाला पूर्णपणे भरून रहिवाशी भागात पाणी शिरल्याचे दृश्य आहे. या परिस्थितीचा व्हिडीओ रहिवाशांनी सोशियल मीडियावर पोस्ट केलाय.