VIDEO : मनसेकडून Dadar च्या हनुमान मंदिरात पूजा, Sandeep Deshpande यांची प्रतिक्रिया
राज्यात मागच्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील सत्ताधारी शिवसेना आणि मनसे या दोन्ही प्रादेशिक पक्षांमध्ये वार-पलटवार सुरु आहे. यापूर्वी आपण या दोन्ही पक्षांमध्ये हिंदुत्वावरुन टीका टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप पाहिले असतील. आता मात्र, मनसेच्या मशिदीसमोर हनुमान चालीसा पठणाच्या नव्या मुद्द्यावरुन हा संघर्ष शिगेला पोहचलाय.
राज्यात मागच्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील सत्ताधारी शिवसेना आणि मनसे या दोन्ही प्रादेशिक पक्षांमध्ये वार-पलटवार सुरु आहे. यापूर्वी आपण या दोन्ही पक्षांमध्ये हिंदुत्वावरुन टीका टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप पाहिले असतील. आता मात्र, मनसेच्या मशिदीसमोर हनुमान चालीसा पठणाच्या नव्या मुद्द्यावरुन हा संघर्ष शिगेला पोहचलाय. यावरुन मनसे शिवसेनेला टार्गेट करण्यासाठी मागच्या काही दिवसांपासून बॅनरबाजी देखील करत आहे. तर प्रत्युत्तरादाखल शिवसेना नेते संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन मनसेवर पलटवार करतायेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केल्यानंतर मनसे विरुद्ध शिवसेना हा वाद अधिक चिघळल्याचं दिसतंय.
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक

