वाशी टोल नाक्यावर सलग तिसऱ्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी
मुंबईतील आझाद मैदानावरील मराठा आंदोलनामुळे शहरातील अनेक भागांमध्ये तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सायन-पनवेल महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत.
मुंबईतील आझाद मैदानावरील मराठा आंदोलनामुळे शहरातील अनेक भागांमध्ये तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सायन-पनवेल महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. तथापि, ईस्टर्न फ्रीवे आणि अटल सेतूवर सध्या वाहतूक सुरळीत आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. अनेक प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मुंबईकरांना कामावर जाण्यासाठी आणि दैनंदिन प्रवासासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. सायन-पनवेल महामार्गावरील वाशी टोल नाका परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वाशी ते मानखुर्द या संपूर्ण मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे.

